परीक्षा - एक अनुभव
मला वाटतं ‘परीक्षा’ हा शब्द बघूनच खूप विद्यार्थी हा लेख वाचणार नाहीत कारण लहानपणापासून परीक्षे एवढं त्यांना भुताने सुद्धा घाबरवलेलं नसतं. तो विदयार्थी कुठल्या ही देशाचा असो मराठी असो व इंग्रज परीक्षा (Exam) या एका शब्दानेच सगळ्यांचा थरकाप उडायला लागतो. ‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’ असा आपण नेहमी म्हणतो. लहानपणीच्या दिवसात असलेलं भाबडं मन, घरच्यांचे लाड हे सगळ्यांच प्रिय वाटतं. परंतु मूल अडीच तीन वर्षांचं झालं की त्याला आपण बालवाडी किंवा KG मध्ये टाकतो. तिथ पासून सुरू झालेला परीक्षेचा प्रवास आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू असतो. लोक म्हणतात की धर्मपत्नी ही आपल्या जीवनाची सहचारिणी असते पण मी म्हणेन की परीक्षा आपल्या जीवनाची खरी साथीदार असते. आजच्या युगात कॉलेजच्या परीक्षा म्हणजे तर एक अप्रूपच असतं. आजच्या वातावरणात मुलांना परीक्षा म्हणजे एक Season वाटतं. जून जुलै पासून कॉलेजची मजा सुरू करायची, धतिंग करायची आणि नोव्हेंबर- डिसेंबर आलं की मग झेरॉक्स सेंटर वर गर्दी करायची. मग तेच नोट्स च्या झेरॉक्स करणे, क...