परीक्षा - एक अनुभव

मला वाटतं ‘परीक्षा’ हा शब्द बघूनच खूप विद्यार्थी हा लेख वाचणार नाहीत कारण लहानपणापासून परीक्षे एवढं त्यांना भुताने सुद्धा घाबरवलेलं नसतं. तो विदयार्थी कुठल्या ही देशाचा असो मराठी असो व इंग्रज परीक्षा (Exam) या एका शब्दानेच सगळ्यांचा थरकाप उडायला लागतो.
‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’ असा आपण नेहमी म्हणतो. लहानपणीच्या दिवसात असलेलं  भाबडं मन, घरच्यांचे लाड हे सगळ्यांच प्रिय वाटतं. परंतु मूल अडीच तीन वर्षांचं झालं की त्याला आपण बालवाडी किंवा KG मध्ये टाकतो. तिथ पासून सुरू झालेला परीक्षेचा प्रवास आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू असतो. लोक म्हणतात की धर्मपत्नी ही आपल्या जीवनाची सहचारिणी असते पण मी म्हणेन की परीक्षा आपल्या जीवनाची खरी साथीदार असते.
आजच्या युगात कॉलेजच्या परीक्षा म्हणजे तर एक अप्रूपच असतं. आजच्या वातावरणात मुलांना परीक्षा म्हणजे एक Season वाटतं. जून जुलै पासून कॉलेजची मजा सुरू करायची, धतिंग करायची आणि नोव्हेंबर- डिसेंबर आलं की मग झेरॉक्स सेंटर वर गर्दी करायची. मग तेच नोट्स च्या झेरॉक्स करणे,            करणे ( स्वतःहून करणे की उचलणे ह्याच्या भानगडीत मी पडणार नाही). आमच्या शिक्षणप्रणालीने एक छान सवय आम्हाला लावून दिली आहे PL (Preparation Leave). Facebook वर नोट्स वैगरेंची जुळवा जुळव फक्त त्याच काळात सुरू होते. आजच्या काळात मुलं Lecture bunk मारतात आणि मग PL मध्ये Assignments copy कर, Websites वरून Projects download कर ह्याचा भानगडीत पडतात. काही विद्यार्थी PL च्या काळात रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात आणि परीक्षेत कसे बसे 60 टक्क्यांच्या आसपास पोहोचतात. रात्री जागण्यासाठी विविध व्यसनांच्या आहारी जाण्यास त्यांना काही नवल वाटत नाही.
ह्या सर्व गोष्टी आजच्या युगात चालत जारी असल्या तरी मला वाटते की ‘परीक्षा‘ हा अनुभव त्याहून ही सुंदर आहे. परीक्षेच्या काळात मुलं जास्त Sincere असतात. त्या काळात आपण नकळत अनोळखी माणसांच्या मैत्रित पडतो. साधी तोंड ओळख असणारा तो मुलगा जीवाभावाचा मित्र बनतो. परीक्षेच्या काळात Library मध्ये असलेलं वातावरण खूपच आल्हादायक असतं. परीक्षेच्या काळात असं वाटतं की वर्ष भर एक- दोन तास जरी Library चं दर्शन घेतलं असतं तरी ही वेळ आली नसती. परीक्षेच्या काळात सुटयांची Planning करण्याची मजा काही औरच असते.
एका चित्रपट लेखकाने एक छान वाक्य लिहिल आहे –
“Taking an Exam is not the matter of life and death,
It’s about the joy of telling yourself that you’ve done it“.
खरच आपण सर्वांनी परक्षेची भीती घालवून त्या परीक्षेला केलेल्या तयारीची मजा लूटली पाहिजे. जर आपण अस केलं तर परीक्षा ही शिक्षा बनणार नाही तर यशाच्या मार्गातील एक पायरी बनेल हे नक्की.
कुणाल समदडिया
9665295808

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Future Of BJP after Modi Shah