विवाहबाह्य संबंध आणि आपण

आजच्या अनेक समस्यांमध्ये गंभीर स्वरूपाची समस्या म्हणजे आजकाल चालणारे एक्सट्रा मॅरिटल अफेअर्स, ज्याला आपण विवाहबाह्य संबंध म्हणतो. लोकांकडे पैसा आहे, सो कॉल्ड स्टेटस आहे परंतु एकमेकांमध्ये असणारी हार्मनी, सुसंवाद नाहीत. वरवर सुखी असल्याचे दाखवणारे नवरा-बायको अंतर्गत कलहाने त्रासलेले असतात कारण त्यांच्या नात्यामधला विश्वास नाहीसा झालेला व त्याचे मूळ कारण म्हणजे लाइफ पार्ट्नरचे अफेअर.

अफेअर्स का होतात हा मोठा प्रश्न आहे. मुळात आपल्या भारतीय संस्कृतीत ह्याला मान्यता नाही. विशेष म्हणजे आजकाल ह्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. मग पूर्वीच्या काळी ह्या गोष्टी नव्हत्या का ? काळ पुढे सरकला तरी स्री व पुरूष तेच आहेत, त्यांच्या शरीराची रचनाही तीच आहे, भावनाही तशाच आहेत मग असे का घडते? अर्थात ह्या गोष्टीमागे अनेक कारणे आहेत.

पूर्वीच्या काळातील स्त्रियांचे वास्तव्य जास्तीत जास्त घरातच असायचे. परंतु आताची स्त्री ही नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडायला लागलीये, विचार बदलले, कामानिमित्त पुरुषांबरोबरचा सहवास वाढला त्यामुळे ह्या गोष्टी घडायला सुरूवात झाली. पुर्वी स्त्रियांना नवरा आवडला, नाही आवडला, कसाही असला तरी तोच आपले सर्वस्व असे समजणे गरजेचे होते कारण आपले संस्कार. परंतु हळूहळू काळ बदलला, स्वतंत्रपणे विचार करण्याची वृत्ती आत्मसात झाली त्यामुळे संपूर्ण वातावरण बदलायला सुरूवात झाली. घरात पार्ट्नर सोबत पटत नसेल, विचार आवडत नसेल वा घराबाहेर त्या विचारसरणीची व्यक्ती सहवासात आली की आकर्षण निर्माण व्हायला सुरूवात होते. त्यात दिसायला सुंदर असेलेल्या स्त्रीयानकडे पुरूष नेहमीच आकर्षित होतात, त्यात काही स्त्रियांना तर हा स्वतःचा गौरव वाटायला लागला. बायको कितीही सुंदर असली तरी तिचा नवरा तिची स्तुती करत नाही परंतु ऑफीस मध्ये असणारे कालिग्स किवा बॉस रोज ह्या सौंदर्याची किवा पेहरावाची स्तुती करतात. त्यामुळे नवरायला आपल्या सौंदर्याची जानीवच नाही ह्या विचारणे नवरयाविषयी मन कलुषित होऊन ते इतर पुरुषांकडे वळले जाते वा त्यातून कित्येकदा अफैर्स निर्माण होतात. बर्‍याचदा पार्ट्नर घरात खूप त्रास देत असेल, समजून घेत नसेल, तेव्हा तर त्याची शक्यता खूप जास्त असते.

पुर्वी पुरुषांचे अफेर्स असायचे वी स्त्रियांच्या बाबतीत प्रमाण कमी होते. परंतु आता तसे राहीले नाही, स्त्रियांनी ह्या बाबतीतही पुरुषंशी बरोबरी केलेली आहे. दहा-बारा वर्षा पुर्वी मुलांचे आई-वडील त्यांच्या मुलांच्या अफ्फैर्सच्या समस्यांनी ग्रस्त होते. परंतु आज ह्या गोष्टी म्हणजे समस्या राहिल्या नाहीत कारण ह्या गोष्टी खूप कॉमन झाल्या आहेत. ती सध्याची लाइफ स्टाइल झाली आहे. परंतु आई-वडिलाच्या अफ्फैर्सच्या समस्या मात्र खूप वाढल्या आहेत. त्यामुळे मुलेही गोंधळून गेलेली आहेत.

तरूणपणात जसा रिस्पोन्स मिळेल त्याप्रमाणे मुलांची वा मुलींची अफेर्स होतात, त्यांचे लग्नही होतात. परंतु पुढे मुले-बाळे झाळयानंतर ती पत्नी त्यांच्यामध्येच इतकी गुंतून जाते, तिचे विश्व म्हणजे तिची मुले, त्यात नवर्याकडे दुर्लक्षा होते. त्याच वेळेस पुरुषांचे अफेर्स होण्याचे चान्सेस असतात, म्हणून पत्नीने सर्वा गोष्टींचा बॅलेन्स साधने गरजेचे असते जेणेकरून नवर्‍याकडे दुर्लक्ष होणार नाही. तसेच जेव्हा मुल मोठी होतात, वयही वाढते, अनुभव वाढतो, मोकळा वेळ मिळायला लागतो, जीवनात थोडे स्थैर्यही येते, काही विशिष्ट  हॉर्मोनल बदल होतात. स्त्रियांमध्ये पुन्हा या गोष्टींबद्दल आकर्षण निर्माण होते. त्याचवेळेस पतीची त्याच्या प्रोफेशनल लाइफची जबाबदारी खूप वाढलेली असते, हॉर्मोनल चेंजस त्यामुळे येणारा थकवा या सर्व गोष्टींमुळे पत्निकडे होणारे दुर्लक्ष, त्यामुळे निर्माण होणारे वाद व त्यातून निर्माण होणारे अफेर्स. आयुष्यात सर्वा गोष्टी गरजेच्या असतात, त्या वेळच्या-वेळी होणे ही गरजेचे असते पण म्हणून 'आवश्यक' त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्या त्या वेळेला गरजेच्या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते नाहीतर त्याच्या अनिष्ट परिणाम वैवाहिक जीवनावर होतोच.

स्त्री व पुरूष यांना एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु आपण माणूस म्हणून जन्माला आलोय तेव्हा सय्यमशील असणे हे आपले कर्तव्य आहे व त्यासाठी मनुष्यप्रण्याच्या जीवनात 'विवाह संस्कार' ही प्रथा अस्तित्वात आली आहे. तेव्हा त्या नियमांचे पालन करणे हे आपले कर्तव्या आहे. नाहीतर कालांतराने इतर प्राण्यांसारखीच 'प्रथा' सुरू होईल हे भान ठेवणे गरजेचे आहे.

मुळात घरातील वातावरण स्वच्छ, शुद्ध, पवित्र व आनंदी कसे राहील, घरात राहणार्‍या व्यक्तींमध्ये सुसंवाद कसा साधला जाईल, एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास कसा टिकून राहील ह्या सर्वा गोष्टींचा विचार आपण केलेला बरा. जेणेकरून कामनिमित्त घराबाहेर पडलेल्या व्यक्तींना घरची, घरातील व्यक्तिंची व घरातील व्यक्तींना कामनिमित्ता बाहेर गेलेल्यांची ओढ  वाटेल व तो आल्यानंतर स्वर्गीया सुखाची अनुभूती होईल.
असो.

Comments

Popular posts from this blog

Future Of BJP after Modi Shah